• Work

    प्रशांत वाघाये हे शैक्षणिक,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रीय असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्वप्नपूर्ती बहुउद्देशीय संस्था लाखनी (स्वप्नपूर्ती फाउंडेशन) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

    लाखनी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्या माध्यमातून लाखनी तालुक्यात आणि परिसरात युवकांचं जाळं त्यांनी तयार केलं आहे. काही शैक्षणिक प्रतिष्ठानांचे सल्लागार आहेत त्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून घेत आहेत.

    वक्ता म्हणून विविध ठिकाणी भाषणं करण्यासाठी जात असतात. चांगल्या व्यक्तिमत्वासह उत्तम संभाषण आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष मार्गदर्शन ते करत असतात.



    स्वप्नपुर्तिच्या कामांचा आणि उपक्रमांचा आढावा.

    १. संस्थेचे सर्व पदधिकारी, कार्यकर्ते तथा मार्गदर्शक यांना वाढदिवसाला रोपटे भेट देणे

    २. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मोती पुरस्कार

    (२०१४ - डॉ. अजय मून २०१५ - प्रा. अशोक गायधने २०१६ - किशोर वाघाये २०१७- डॉ. प्रतिभा राजहंस २०१८- डॉ. चंद्रकांत निंबार्ते २०१९- श्री. मुबारक सय्यद )

    ३. गुणवंत विद्यार्थी, विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आणि माजी सैनिकांचा सत्कार (प्रत्येकवर्षी)

    ४. श्रीमती विजयाताई लांजेवार प्राथ. शाळा, खरबी रोड, नागपुर येथील १५ विद्यार्थ्यांना सलग २ वर्षे (शैक्षणिक सत्र २०१२-१३ आणि २०१३-१४) शैक्षणिक साहित्य वाटप

    ५. Ace institute of Education languages and pvt. Ltd. या नागपुर शहरातील प्रसिद्ध अशा इंग्रजी भाषा बोलण्याच् प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा तथा बक्षीस वितरण

    ६. स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी २०१४) निमित्त लाखनी तालुक्यात निबंध स्पर्धा व बक्षीस वितरण

    ७. Career in Engineering and Management या विषयांवर यूनिवर्सल इंग्लिश स्कूल लाखनी येथे तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शनपर कार्यशाळा

    ८. सक्सेस ट्यूशन क्लासेस लाखनी येथे व्यक्तिमत्व विकास विषयावर कार्यशाळा

    ९. राजे छत्रपति मूक बधिर विद्यालय भिलेवाडा, भंडारा येथील विद्यार्थ्यांसोबत मैत्री दिवस साजरा, तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसच खेळाच् साहित्य, कपडे वितरण आणि सोबतच तेथील सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण, शाळा परिसरात वृक्षारोपण आणि टेकडीवर सहल (३ ऑगस्ट २०१४)

    १०. सावित्रीबाई फुले जयंती ते स्वामी विवेकानंद जयंती (३ जानेवारी २०१५ ते १२ जानेवारी २०१५) दरम्यान स्वसंरक्षण मार्गदर्शन शिबिर, ११० विद्यार्थ्यांचा सहभाग, उत्कृष्ठ ६ शिबिरार्थिन्चा गौरव

    ११. चित्रकला स्पर्धा व बक्षीस वितरण (१२ जानेवारी २०१५)

    १२. जि.प.गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लाखनी येथे "भारतीय तरुण - काल, आज आणि उद्या" या विषयावर व्याख्यान (मार्च २०१५) व्याख्याते: प्रशांत वाघाये

    १३. लाखनी शहरात पहिल्यांदाच सुंदर असा नेत्रदीपक शिवजन्मोत्सव सोहळा (१९ फेब्रुवारी २०१५)

    १४. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माऊली मंदिर परिसरात (लाखोरी रोड लाखनी) वृक्षारोपण

    १५. वृक्ष माझा सखा मोहीम

    १६. राजे छत्रपति मूक बधिर विद्यालय भिलेवाडा, भंडारा येथील विद्यार्थ्यांसोबत मैत्री दिवस साजरा, तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसच खेळाच् साहित्य, कपडे वितरण आणि सोबतच तेथील सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप, शाळा परिसरात वृक्षारोपण (२ ऑगस्ट २०१५)

    १७. गांधी जयंती निमित्त यूनिवर्सल स्कूल लाखनी यांच्याद्वारे आयोजित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लाखनी शहर सफाई उपक्रमात सहभाग दि. ०२/१०/१५

    १८. मास्टर माइंड क्लासेस लाखनी येथे स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त "भारतीय तरुण" यासह स्पर्धेच्या युगात आपलं स्थान, व्यक्तिमत्व विकास आणि २१ व्या शतकात इंग्रजी भाषेचं महत्व यावर मार्गदर्शन (मार्गदर्शक: प्रशांत वाघाये)

    १९. आकृती कंप्यूटर सेंटर लाखनी व स्वप्नपूर्ति बहुउद्देशीय संस्था लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमहर्षी स्व.बापूसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी वर्ष निमित्त स्वामी विवेकानंद जयंतीच्या औचित्यावर ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धा. दि. १२/०१/२०१६ विषय: स्वामी विवेकानंद आणि त्यांचे जीवनचरित्र

    २०. आई तुकाई महिला मंडळ व स्वप्नपूर्ति बहुउद्देशीय संस्था लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ जानेवारी २०१६ रोज रविवारला "महिला मेळावा तथा हळदीकुंकु कार्यक्रम" यानिमित्ताने 'महिला सबलीकरण' या विषयावर विशेष मार्गदर्शन

    २१. लाखनी शहरात सुंदर अशा नेत्रदीपक शिवजन्मोत्सव सोहळयाचं दुसरं वर्ष (१९ फेब्रुवारी २०१६)

    २२. विविध क्षेत्रातील करियर विषयक मोफत मार्गदर्शन

    २३. स्वप्नपूर्ति बहुउद्देशीय संस्था व निट्स कंप्यूसिस यांच्या संयुक्त विद्यमाने "व्यक्तिमत्व विकास व व्यक्तिमत्व विकासाचे घटक" कार्यशाळा प्रमुख मार्गदर्शक: प्रशांत वाघाये दि.२७ ऑगस्ट २०१६

    २४. स्वामी विवेकानंद जयंती "राष्टीय युवक दिन" च्या औचित्यावर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा दि.१२ जानेवारी २०१७

    २५. लाखनी शहरात सुंदर अशा नेत्रदीपक शिवजन्मोत्सव सोहळयाचं तिसरं वर्ष (१९ फेब्रुवारी २०१७)

    २६. स्वप्नपुर्ती फाउंडेशन व समर्थ महाविद्यालय लाखनी द्वारे आयोजित व्यक्तिमत्व विकास व वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा ४ ते ७ जून २०१७

    २७. स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे पर्यावरणस्नेही किल्ले बनवने स्पर्धा (दिवाळी २०१७)

    २८. आजच्या युवकांचे भविष्य, भारतीय तरुण या विषयावर लिटील फ्लावर स्कूल येथे मार्गदर्शन (१२ जानेवारी २०१८)

    २९. शिवजयंती निमित्त लाखनी शहरात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन. (१८ फेब्रुवारी २०१८)

    ३०. सुंदर अशा नेत्रदीपक शिवजन्मोत्सव सोहळयाचं चौथं वर्ष (१९ फेब्रुवारी २०१८)

    ३१. लोकसहभागातून ग्रामविकास या विषयवार खराशी येथे मार्गदर्शन. (२४ फेब्रुवारी २०१८)

    ३२. दिव्यांग मुलांसाठी आयोजित ग्रीष्मकालीन शिबिरात मार्गदर्शन आणि भोजनदान. (१३ जून २०१८)

    ३२. स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबतर्फे पर्यावरणस्नेही किल्ले बनवने, पर्यावरण जागृती रांगोळी स्पर्धा (दिवाळी २०१८)

    ३३. "युवा दिन" स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती प्रीत्यर्थ स्वप्नपूर्ती फाउंडेशन आणि विवेकानंद सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा. स्थळ: राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी. दि. १२ जानेवारी २०१९, दुपारी २ वा. एकूण ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग.

    ३४.शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय पोवाडेगायन, वक्तृत्व आणि शिवसंस्कृती दर्शन नृत्य स्पर्धा. दि. १६ व १७ फेब्रुवारी २०१९

    हे शक्य झाल ते आपल्यासारख्या सर्व समाजसेवी लोकांच् प्रेम, सहकार्य, पाठबळ, मार्गदर्शन यामुळेच. पुढेदेखिल अशीच सोबत कायम असू दया. या यशात आपला सिंहाचा वाटा आहे.

    टिम स्वप्नपूर्ती:

    संस्थापक अध्यक्ष: प्रशांत वाघाये, उपाध्यक्ष: प्राची बेदरकर, सचिव: सुधिर काळे, सहसचिव: निलेश राऊत, कोषाध्यक्ष: लक्ष्मीकांत ठवकर, सदस्य: माया बोरकर, भारती वाघाये, निखिल काळे, याह्या आकबानी.

    सहयोगी सदस्य: आशीष राऊत, विशाल हटवार, सचिन अंबादे, नितेश टिचकुले, सुधन्वा चेटुले, अतुल नागपुरे, लक्ष्मण बावनकुळे, संदीप बेदरकर, उमेश सिंगणजुडे, सुनील भाग्यवानी, बाळासाहेब चव्हाण, आशीष बडगे, जय राठोड, दौलत लुटे, सुभाष गरपडे, ओंकार चवडे, अंजली भांडारकर, कविता डुंभरे, आशा वनवे, स्मिता सिंगणजुडे, मीनाक्षी सिंगणजुडे, जयश्री सिंगणजुडे, अनिकेत नगरकर, उस्मान आकबानी, अनन्या भांडारकर, दीक्षा जमैवार

    मार्गदर्शक: प्रा.डॉ.अजय मून, प्रा.सौ.कविता ठाकरे खुदळे

    सल्लागार:

    किशोर वाघाये, अंगेश बेहलपांडे, अतुल भांडारकर, संजय वनवे, रोशन भोंडेकर

    धन्यवाद..!

    आपला,

    प्रशांत सुरेशराव वाघाये,

    अध्यक्ष- स्वप्नपूर्ति बहुउद्देशीय संस्था, लाखनी.

    फेसबुक पेज लिंक:

    https://www.facebook.com/Swapnaurti.Foundation/